कुडाळ (प्रतिनिधी)
हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सखी महीला ग्रामसंघ आयोजित आरोग्य शिबीर हुमरमळा येथे मैथीली अपार्मेट मध्ये उपसरपंच सौ रश्मी वालावलकर आणि माजी सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
सखी महीला संघाची सर्व साधारण सभा आयोजित करुन यावेळी महीलांना आरोग्याच्या दृष्टीने उपचार व्हावेत म्हणून हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने आरोग्य शिबीर आयोजित केले या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
यावेळी माजी सरपंच सौ अर्चना बंगे, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम अपर्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी कद्रेकर, सखी महीला अध्यक्ष श्रीम सुष्मा वालावलकर, उपाध्यक्ष रश्मी परब, सि आर पी मानसी वालावलकर, सी आर पी सौ दिपाली गुंजकर व डॉक्टर उपस्थित होते
हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सखी महीला ग्रामसंघ आयोजित आरोग्य शिबीर संपन्न
