झाराप येथील जीवदान विशेष शाळेतील बालकांना शैक्षणिक साहित्य,खाऊचे वाटप.
सावंतवाडी प्रतिनिधी
मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा अनेक विधायक
उपक्रम राबविले जातात. समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम मल्लसम्राट करीत आहे. आज खऱ्या अर्थाने युवकांना चांगली दिशा यातून मिळत असून प्रतिष्ठांच्या माध्यमातून सतत भरीव सामाजिक कार्यदेखील घडत आहे घडत आहे. मल्लसम्राटच्या या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी काढले. मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने जीवदान विशेष शाळा झाराप (मतिमंद प्रवर्ग) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख होते. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद धुरी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब, मल्लसम्राटचे सचिव पै. ललित हरमलकर, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सहसेक्रेटरी फिजा मकानदार, निरवडे ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव, पीआरओ साबाजी परब, तसेच ह्युमन राईट वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद कांडरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील नेवगी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रोजम्मा जोब आदि उपस्थित होते.
