कुडाळ तालुक्यातील २२६ तर मालवण तालुक्यातील १९५ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात येत असून यात कुडाळ व मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित केल्या जात आहेत. यात कुडाळ तालुक्यातील एकूण २२६ प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना तर मालवण तालुक्यातील एकूण १९५ प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.