सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याच्या कथित हत्या प्रकरणात आरोपी वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट यांना आज, १४ जुलै २०२५ रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी जामीन मंजूर केला. आरोपीचे वकील अॅड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या
7:43
R15G+
जातमुचलक्यावर अटी व शर्तीसह शिरसाट यांची जामिनावर मुक्तता केली. अॅड. प्रणाली मोरे, अॅड. विनय मांडकुलकर, अॅड. वृषांग जाधव आणि अॅड. सुयश गवंडे यांनीही आरोपीच्या वतीने बाजू मांडली.
प्रकरण काय आहे?
हे प्रकरण निवती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. १२/२०२५ आणि सत्र प्रकरण क्र. ५५/२०२५ शी संबंधित आहे. आरोपी वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२ (हत्या), ३६४ (अपहरण), २०१ (पुरावा नष्ट करणे), १२० (ब) (गुन्हेगारी कट) आणि ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची प्राथमिक हकीकतः
दिनांक ०९/०४/२०२५ रोजी मालती मधुकर चव्हाण (वय ५०, रा. मु. पो. चेंदवण, नाईकनगर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांनी निवती पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर हा कुडाळ येथे सिद्धेश अशोक शिरसाट यांच्याकडे कामाला होता. तीन वर्षांपूर्वी बिडवलकरने आपण सिद्धेश शिरसाटकडून पैसे घेतल्याचे सांगितले होते, त्यावेळी मालती चव्हाण यांनी त्याला कामावर न जाण्यास सांगितले होते. २०२३ च्या गुढीपाडव्यापूर्वी बिडवलकर चेंदवण येथे आला होता. गुढीपाडव्यानंतर १० ते १५ दिवसांनी मालती चव्हाण घरी परतल्या असता, बिडवलकरची मूकबधिर मावशी शशिकला चव्हाण यांनी खाणाखुणांद्वारे सांगितले की, पहाटे सिद्धेश शिरसाट आणि त्याच्यासोबतच्या तीन व्यक्तींनी ग येऊन पक्याला जबरदस्तीने घेऊन गेले.
या घटनेनंतर तब्बल दोन वर्षांनी मालती चव्हाण यांनी सिद्धेश शिरसाट (रा. कुडाळ), गणेश नार्वेकर (रा. माणगाव), सर्वेश केरकर (रा. सातार्डा) आणि अमोल शिरसाट (रा. कुडाळ) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली.
पोलिसांची कारवाई आणि अटकेची प्रक्रियाः
या फिर्यादीच्या आधारे निवती पोलीस ठाण्याने सिद्धेश शिरसाट, गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३६४ (अपहरण) आणि ३४ (समान उद्देश) अन्वये गुन्हा रजि. नं. १२/२०२५ दाखल करून त्यांना १०/०४/२०२५ रोजी अटक केली. त्याच दिवशी त्यांना कुडाळ येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात रिमांड रिपोर्टसह हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने त्यांना १९/०४/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी दिली.
१३/०४/२०२५ रोजी आरोपी क्र. १ ते ४ यांना न्यायालयात हजर करून, पूर्वीच्या रिमांड रिपोर्टमधील कलमांमध्ये बदल करून भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३०२, ३६४, २०१, १२० (ब) आणि ३४ अन्वये त्यांना हजर करण्यात आले. आरोपी क्र. १ ते ३ साठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली, तर आरोपी क्र. ४ म्हणजेच अर्जदार अमोल शिरसाट यांच्या आजारपणाच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने आरोपी नं. १ ते ३ यांना १५/०४/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आणि आरोपी नं. ४ ला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
१४/०४/२०२५ रोजी आरोपी नं. १ ची प्रकृती बिघडल्याने निवती पोलिसांनी त्याची न्यायालयीन कोठडीची मागणी कला,
जी न्यायालयाने मान्य केली. १५/०४/२०२५ रोजी आरोपी नं. २ आणि ३ यांना न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली असता, न्यायालयाने त्यांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पुढील तपास आणि जामीन अर्जः
१८/०४/२०२५ रोजी आरोपी क्र. १, ३ आणि ४ यांना पुन्हा ताब्यात घेण्या संदर्भात न्यायालयात अर्ज केला असता, न्यायालयाने त्यांना १९/०४/२०२५ रोजी न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिला. १८/०४/२०२५ रोजी अर्जदार (आरोपी क्र. ६) यांना अटक करण्यात आली. १९/०४/२०२५ रोजी आरोपी नं. १, ३, ४, ५ आणि ६ यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली असता, न्यायालयाने त्यांना २२/०४/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
२२/०४/२०२५ रोजी आरोपी नं. १, ३, ४, ५ आणि ६ यांना पुन्हा न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली, जी न्यायालयाने मंजूर केली. माहितीनुसार, आरोपी वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट सध्या रुग्णालयात दाखल आहेत.
सदरचा गुन्हा सत्र न्यायालयात चालणारा असल्याने, आरोपीच्या वतीने अॅड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी जिल्हा न्यायालयात ०२/०७/२०२५ रोजी जामीन अर्ज दाखल केला. यावर १०/०७/२०२५ रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने केलेला युक्तिवाद आणि दाखल केलेल्या कागदपत्रांचा विचार करून, आरोपीला योग्य अटी व शर्तीवर आणि ५० हजार रुपये रकमेच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.
