वेंगुर्ला (प्रतिनिधी)
रेडी माऊली मंदिरातील धार्मिक विधी निमित्त उपस्थित राहिलेले सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा देवस्थानतर्फे सत्कार करण्यात आला.
कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेली रेडी येथील माऊली मंदिरात नुकतीच श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न झाली. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी उपस्थित राहून श्री माऊलीचे व श्रीसत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले. त्यांच्या या भेटीदरम्यान, देवस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे मानकरी आणि जि.प.चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिग राणे, भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, सचिन साटेलकर, समिर पालव यांच्यासह देवस्थानचे अन्य मानकरी उपस्थित होते.