नाईक पदावर काम करणारी व्यक्ती सुध्दा शासनाचे इमाने इतबारे काम करु शकतात:कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे!
कुडाळ (प्रतिनिधी)
महसुल दीनाचे औचित्य साधून आज कुडाळ तहसीलदार कार्यालयात महसुल मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा तहसीलदार विरसिंग वसावे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कुडाळ तहसीलदार कार्यालयातील प्रामाणिक पणे काम करणारे कारकुन श्री चंद्रकात न्हावेलकर यांचा सन्मान करण्यात आला
यावेळी कुडाळ महसुल मधील अधिकारी व शिपाई कारकुन यांचाही सहभाग होता
यावेळी कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे नायब तहसीलदार श्री संजय गवस, नायब तहसीलदार श्री जाधव व तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी उपस्थित होते
