माणगाव प्रतिनिधी
कुडाळ- मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या आदेशानुसार गोठोस गावचे रहिवासी युवा तडफदार नेतृत्व सामाजिक कार्याची तळमळ असणारे व्यक्तिमत्व सागर सावंत यांची युवा सेना घावनळे उपविभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.त्यांचे आजवरचे कार्य पाहून त्यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या या निवडीमुळे घावनळे मतदार संघ विभागातून पक्ष वाढीसाठी फायदा होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरात कौतुक होत आहे.
युवा सेना घावनळे उपविभाग प्रमुख पदी सागर सावंत यांची निवड..
