कोकणात राज्यभरातील मुलींना उच्च शिक्षण घेत असताना नक्कीच या योजनेचा फायदा होणार..
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारचा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक अडचणी येवू नयेत, यासाठी कमवा व शिका योजनेतून सुधारणा करून दरमहा दोन हजार रुपये देण्याचा प्रस्ताव असून काहीच दिवसापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यासंबंधी माहिती जाहीर केली होती.
या योजनेस मान्यता मिळाल्यास पहिल्या टप्प्यात तब्बल पाच लाख विद्यार्थिनींना लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. कोकणासह राज्यभरातील मुलींना उच्च शिक्षण घेत असताना नक्कीच या योजनेचा फायदा होणार आहे.
मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिकवणी शुल्क माफ करण्यात आल्यानंतर 842 अभ्यासक्रमांचे शुल्क माफ करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने धोरण आखण्यात येत आहे. आता त्यातच कमवा व शिका योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार रुपये कमावण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार असून जेणेकरून विद्यार्थिनींना या पैशातून दैनंदिन खर्च भागवण्यासाठी, शैक्षणिक साहित्य खरेदी करता येणार आहे. कमवा व शिका या योजनेचा आराखडा तयार होत आहे. प्रत्येक महाविद्यालय त्यांच्याकडील विद्यार्थिनींना विविध प्रकारचा रोजगार देण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच अशा विद्यार्थिनींची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मागवण्यात येणार आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थिनी काम
खात्यात दरमहा दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत जमा करण्यात येतील. सुरुवातीला या योजनेचा लाभ पाच लाख विद्यार्थिनींना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी दरमहा 100 कोटीरुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
