अवैध गुटखा,पानमसाला,सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत तिघांना अटक

ट्रक सह तब्बल १० लाख ८७ रुपयाचा मुद्देमाल जप्त;पहाटे सात च्या सुमारास कारवाई

कुडाळ प्रतिनिधी
अवैध गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन कुडाळ पोलिसांनी तब्बल तिघांना अटक केली असून त्यांच्याकडुन ट्रक सह तब्बल १० लाख ८७रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी ७वाजण्याच्या सुमारास पाठलाग करून कुडाळ एमआयडीसी येथे करण्यात आली. या प्रकरणी सुशील बाळकृष्ण परब (वय ४०, रा. कुडाळ-पानबाजार) गजानन निळकंठ चोपडेकर (वय ६०), हेमंत गजानन चोपडेकर (वय २९, दोघे रा. वेंगुर्ला कॅम्प-भटवाडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कुडाळ येथील सुशील बाळकृष्ण परब यांनी हा प्रतिबंधित माल मागवला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिसांनी गुरुवारी सकाळी झाराप येथे सापळा रचला. पोलिसांना पाहताच ट्रकचालकाने गाडी न थांबवता वेगाने कुडाळच्या दिशेने नेला. पोलिसांनी पाठलाग करून एमआयडीसी तिठा येथे ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता, त्यात विविध कंपन्यांचे पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूच्या पुड्यांचे बॉक्स, सुगंधी काश्मिरी मसाला पेस्ट, आणि कात पावडर असा सुमारे ७२ हजार ५८ रुपयांचा प्रतिबंधित माल आढळून आला. तसेच, या गुन्ह्यासाठी वापरलेला सुमारे १० लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त करण्यात आला. या प्रकरणी
पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम य मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील क आहेत. हा सर्व प्रतिबंधित माल बेळगावहून मागवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page