स्थानिक सरपंच यांनी मानले व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ गोवा आणि डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्टचे आभार
दोडामार्ग (प्रतिनिधी)
व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ गोवा आणि ज चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने दोडामार्ग तालुक्यातील केर गावात नुकताच शुभारंभ झालेल्या आरोग्य एक्सप्रेस ने आता व्याप्ती वाढवली आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्रामस्थांना दर्जेदार आणि गावांत सेवा मिळावी म्हणून सुरु झालेला उपक्रम घोटगेवाडी ते हेवाळे गावापर्यंत पोहचला आहे. या तिन्ही गावांत मिळून विशेष शिबिरात 485 जणांची आरोग्य तपासणी झाली आहे. शिवाय दर महिन्याला आरोग्य तपासणी होणार तसेच अजूनही ग्रामीण गावांत सेवा दिली जाईल अशी माहिती कार्यक्रम व्यवस्थापक विकास कुलकर्णी यांनी दिली.
व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ गोवा आणि डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल, विर्डी नंतर तिलारी खोऱ्यातील जनतेला मोफत आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी कार्यक्रम व्यवस्थापक विकास कुलकर्णी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते
वैभव इनामदार, पत्रकार तेजस देसाई यांनी मागणी केली होती त्यानंतर याबाबत सदर गावांचा सर्व्हे संस्थेकडून करण्यात आला. केर सरपंच रुक्मिणी नाईक, घोटगेवाडी सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच सौ. वैशाली विलास गवस, माजी उपसरपंच समीर देसाई यांच्याशी विशेष बैठका संपन्न झाल्या त्यानंतर ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचे नियोजन झाले. या स्वयंसेवी आरोग्य संघटनेचे विकास कुलकर्णी (कार्यक्रम व्यवस्थापक), डेलिला परेरा (एचआर मॅनेजर) प्रवीण कांबळे (प्रकल्प कार्यकारी), आरती नाईक (प्रकल्प समन्वयक), डॉ. आकांक्षा मडकईकर (वैद्यकीय अधिकारी), डॉ. प्राची नाईक (वैद्यकीय अधिकारी), शकुंतला कवठणकर (परिचारिका), अंकिता सावंत (परिचारिका), गगन प्रियोलकर (फार्मसिस्ट), मंगलदास उस्तेकर (सहाय्यक), शंकरराव देसाई (डेटा कर्मचारी) अंजू अमरोस्कर (डेटा कर्मचारी), सागर गिरी (सहाय्यक) प्रशांत नाईक (सहाय्यक) हे उपस्थित राहून आरोग्य शिबीर नियोजन करत असतात. ग्रामस्थांना विनाशुल्क गावांत घरापर्यंत आरोग्य सेवा मिळावी यासाठी सुरु असलेल्या आरोग्य एक्सप्रेस शिबिरात सामान्य तपासणी ( रक्तदाब, साखर, वजन, इतर सामान्य आजार), नेत्र तपासणी, रक्त तपासणी (संपूर्ण रक्त घटक तपासणी, कोलेस्टेरॉल, सरासरी रक्त शर्करा, थायरॉइड) अस्थी घनता तपासणी (वयोगट ३५ आणि पुढील ६५ वर्षांपर्यंत फक्त) अशी तपासणी करण्यात आली.
* [फक्त एकदा नव्हे दर महिन्याला आरोग्य तपासणी] *
व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ गोवा आणि डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने जो ग्रामीण भागात मोफत आरोग्यसेवा देण्याचा उपक्रम घेतला हा गावागावातील आरोग्यसेवा बळकट करणारा आहे. विशेष तपासणी शिबीरात अनेक प्रकारच्या तपासण्या होतात शिवाय दर महिन्याला तपासणी हे काम संस्थेच्यावतीने कार्यक्रम व्यवस्थापक विकास कुलकर्णी यांच्याकडून नियोजनबद्ध होते. अनेक शिबीरे ही
विकास कुलकर्णी यांच्याकडून नियोजनबद्ध होते. अनेक शिबीरे ही वर्षातून एकदा होतात मात्र या संस्थांचे वैशिष्ट्य म्हणजे दर महिन्यालाही मधूमेह आणि उच्चरक्तदाब तपासणी होते आणि मोफत उपचार होतात त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थ आंतरिक समाधान घेऊन या शिबिरातून घरी जातो
*बॉक्स*
(*एक वर्षात तालुक्यातील तब्बल ८ हजार ५०० रुग्णांना लाभ * )
संस्थेची ही आरोग्यसेवा २०२४ सालापासून तळेखोल, विर्डी आदी गावातुन झाली. गेल्या एक वर्षात या आरोग्य एक्सप्रेसचा ८ हजार ५०० रुग्णानी लाभ घेतला तर दर महिन्यालाही मोफत स्वरूपात डायबेटीस (१३४), प्रेशर (२३५) तर अनेमिया (६७) रुग्ण लाभ घेत असल्याचेही कार्यक्रम व्यवस्थापक श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
* बॉक्स*
* (मोफत चष्मा, औषधे आणि मोतीबिंदू शस्रक्रिया) *
आरोग्य शिबीरमध्ये आरोग्य तपासणी सह रक्त तपासणी मोफत केली जातेच शिवाय ताबडतोब रुग्णांना गोळया औषधं दिली जातात. एवढंच नव्हे तर मोफत चष्मा वितरित करतात आणि ज्यांना मोतीबिंदू आहेत त्यांच्या शस्त्रक्रियाही निशुल्क होतात. तसेच मोठया शस्त्रक्रिया असल्या तरी त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जातो. ‘प्राथमिक सेवा आपल्या दारी’ हे वचन घेऊन संस्था कार्य करताना सध्या दोडामार्ग तालुक्यात दिसत आहे.
