वेंगुर्ला सागरतीर्थ किनाऱ्यावर वाळूची तस्करी शासनाचे दुर्लक्ष..
वेंगुर्ला प्रतिनिधी
वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर अनेक दिवस अवैध वाळू तस्करी होते, ह्याच्या विरोधात सागरतीर्थ येथील ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी महसूल आणि पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी, वरील आशयाचे बॅनर गावात लावले आहेत. राजरोस पणे ही वाळू तस्करी होताना दिसतेय त्यामुळे भविष्यात समुद्राचे पाणी गावात आणि शेतांमध्ये घुसले तर काही वावगं नाही अशा आशयाची माहिती स्थानिक मच्छिमार श्री शैलेश फोडनाईक यांनी पत्रकारांना दिली. शासन दरबारी वारंवार तक्रारी देऊनही कोणी दाद देत नसल्याने आम्हा मच्छिमारांना हा लोकशाहीला साजेसा पर्याय अवलंबवावा लागला असे फोडनाईक आणि सहकारी पुढे म्हणाले. या वाळू चोरिचा शसनाने लवकरच बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे.
