आकेरी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सहित पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश.
कुडाळ प्रतिनिधी
माणगाव जि. प. गटातील आकेरी गावचे सरपंच श्री. महेश जामदार, उपसरपंच श्री. गुरुनाथ पेडणेकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद घोगळे, मेघा गावडे, मैथिली पालव, प्राजक्ता मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेश मेस्त्री, बुथ प्रमुख अभय राणे, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची माणगांव जिल्हा परिषद मध्ये ताकद वाढली असून येत्या जिल्हा परिषद व पं. स. निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जातो.
या पक्ष प्रवेशासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत साहेब, जिल्हा उपाध्यक्ष सौ. संध्या तेर्से, श्री. बंडया सावंत, श्री. राजू राऊळ, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाई सावंत, रुपेश कानडे, पप्या तवटे, मोहन सावंत, राजा धुरी, अजय आकेरकर, साधना माडये, श्वेता लंगवे, रामचंद्र परब, दिपक काणेकर, अजय डिचोलकर, सुनिल बांदेकर, शशांक पिंगुळकर, तन्मय वालावलकर, अशोक कंदूरकर, सिताराम तेली, सोनू मेस्त्री, विजय वारंग गुणाजी जाधव, संदेश वेंगुर्लेकर, आदी उपस्थित होते.
