मंदार शिरसाट त्यांना आपल्या नगरसेवकांना सुद्धा सांभाळता आलं नाही त्यांनी विकासाच्या गोष्टी करू नये

कागदोपत्री विकास दाखवणाऱ्यांना सांगू इच्छिते विकास करण्यासाठी धमक लागते:प्राजक्ता बांदेकर

कुडाळ प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षांमध्ये तुमच्याजवळ सर्व सत्तास्थाने होती तरीसुद्धा तुम्ही कुडाळमध्ये एकही प्रकल्प सुरू करू शकला नाहीत. यामध्ये तुमचे अपयश दडलेले आहे अशी टीका उबाठा शिवसेनेचे मंदार शिरसाट यांच्यावर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी केली तसेच त्या म्हणाल्या स्वतःच्या पक्षातील नगरसेवक ज्यांना सांभाळता येत नाहीत त्यांनी विकासाच्या बाता करू नयेत असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.

कुडाळ नगरपंचायतीच्या क्षेत्रातील सार्वजनिक गणेश घाट येथे सुशोभीकरण कामाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाल्यानंतर उबाठा सेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी हे काम माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या कारकीर्द मध्ये मंजूर झाले होते त्या कामाचा शुभारंभ यांनी केला अशी टीका केली होती या टीकेला नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी उत्तर दिले आहे. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आमदार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नगरपंचायतीच्या आढावा घेतला आणि या आढाव्यामध्ये विकासाला आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती घेतली तसेच शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारे प्रकल्प जाणून घेतले. गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व माजी आमदार वैभव नाईक हे करत होते पण त्यांनी कधीही या नगरपंचायतीच्या विकासाबाबत आढावा घेतला नाही आता मंदार शिरसाट ज्या कामांचा उल्लेख करत आहेत ती कामे फक्त कागदावर दिसत होती निधी मंजूर करून आणला म्हणून सांगत होते पण प्रत्यक्षात हा निधी नगरपंचायतीला वर्ग झाला नव्हता कागदोपत्री विकास दाखवणाऱ्या मंदार शिरसाट यांना एवढे सांगू इच्छिते की, हा विकास करण्यासाठी धमक लागते. ही धमक आमदार निलेश राणे यांनी दाखवली आहे या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे गणेश घाटासाठी एवढा निधी येऊ शकला असे सांगून मंदार शिरसाट यांना आपल्या नगरसेवकांना सुद्धा सांभाळता आलं नाही त्यांनी विकासाच्या गोष्टी करू नये अशी टीका नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page