यशवर्धन राणे यांना शिवसेना कडून पदवीधर संघाची उमेदवारी मिळावी,

युवा सेनेची मागणी:युवकांचा पुर्ण पाठिंबा असेल

कुडाळ प्रतिनिधी
युवा फोरमचे अध्यक्ष अॅड. यशवर्धन राणे यांना कोकण पदवीधर मतदार संघातुन उमेदवारी मिळाल्यास राणे यांना युवकांचा पुर्ण पाठिबा असेल अशी भुमिका पत्रकार परिषदेत युवा फोरमच्या वतीने भुषण गावडे व दर्शन पाटकर यांनी जाहीर करीत, यशवर्धन राणे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी शिंदेसेनेकडे करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
कुडाळ येथे युवाkanchya वतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी युवा फोरमचे जिल्हाध्यक्ष शुभम सिंदणिकर, rashtrawadi obc cell jilhadhyaksh सर्वेश पावसकर, रोहन करमळकर, केतन शिरोडकर, भूषण मेस्त्री, प्रथमेश नाईक, अभिजीत येडगे, हेमंत धोपेश्वरकर, भूषण गावडे, धनराज चव्हाण, गोपाळ राऊळ, सौरभ शिरसाट, सौरभ राऊळ, विराज बांदेकर, जावेद मेमन,
दीपक राऊळ, प्रकाश रजपूत, हरेश कुडाळकर, हर्षद गाडी, गोपाळ तेली, सचिन पावसकर, नंदराज पावसकर, अक्षय पावसकर, मंदार खोत, प्रथमेश खोत, योगेश हेरेकर, सुदेश खोत आदी उपस्थित होते. यावेळी भुषण गावडे म्हणाले, विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत. होवु घातलेल्या पदवीधर निवडणुकीसाठी यशवर्धन इच्छुक आहेत. तरी सर्व युवकांचा राणे यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा आहे.
यावेळी दर्शन पाटकर यांनी सांगितले की, युवा फोरमच्या माध्यम ातून महिला, मुले, युवा, बेरोजगार यांचे अनेक
प्रश्न सोडविले. जिथे गाव तिथे युवाफोरम संस्था पोहोचलेली आहे. राणे यांचे कार्य वाखाणण्याजोग आहे त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी राणे यांचे नाव आम्ही पुढे घेवुन जात आहोत.
काळसे पंचक्रोशी अंपग सेवा संस्था अध्यक्ष विनोद धुरी यांनी सांगितले की, राणे यांना उमेदवारी मिळाल्यास आमचे, सर्व दिव्यांग बांधव पांठिबा देतील असे त्यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page