सिंधुदुर्ग प्रतिनिधी
आगामी जि.प/पं स आणि नगरपालिका/
नगरपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे हे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
सायंकाळी ४:०० वाजता भाजपा जन संपर्क कार्यालय
सावंतवाडी शिरोडा नाका येथे निवडणूक आढावा बैठका संपन्न होणार आहेत.
जिल्ह्यातील ५० जीप गट १०० पंचायत समिती गण आणि कणकवली, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या नगरपालिका/नगरपंचायत यांच्या निवडणुका नियोजित आहेत. या सर्व जागांवरील भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक तयारीचा विस्तृत आढावा यावेळी दोन्ही मान्यवर घेणार आहेत. या आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रमोदजी जठार, संघटनमंत्री शैलेंद्रजी दळवी यांच्यासह भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष जि.प/पं. स /नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक प्रभारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने देण्यात आली.
