सावंतवाडी उबाठा तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आणि सावंतवाडी उबाठा विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत आणि शिंदे शिवसेनेचे रुपेश पावसकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश..

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडीत ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सावंतवाडी उबाठा तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आणि सावंतवाडी विधानसभा उबाठा प्रमुख विक्रांत सावंत आणि शिंदे शिवसेनेचे रुपेश पावसकर सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रवेशामुळे ठाकरे सेनेला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. आगामी सावंतवाडीतील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात असून, भाजपच्या संघटनात्मक बळकटीत यामुळे अधिक भर पडणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

विशाल परब यांच्या संकल्पनेतून झालेल्या भाजपच्या साकार जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page