माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांनी विरंगुळा केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला
कुडाळ:- सिंधुदुर्ग जेष्ठ नागरिक सेवा संघ शाखा माणगाव पंचक्रोशी यांच्या वतीने माणगाव येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र याचा उद्घाटन सोहळा उद्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10. वाजता गणेश पूजन करून होणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग ज्येष्ठ नागरिक संघ माणगाव कार्यकारणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
♦️ माणगाव पंचक्रोशी परिसरातील जेष्ठ नागरिक यांच्या इच्छाशक्तीतून कै. गजानन उर्फ आबा केसरकर व त्यांचे मित्र डॉ. दत्ता शिरसाठ अध्यक्ष जेष्ठ नागरिक सेवा संघ शाखा कुडाळ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन पालकमंत्री दीपक भाई केसरकर यांनी या विरंगुळा केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे हे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पूर्ण झाले त्या केंद्राचा शुभारंभ होताना सर्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
