अनेक भाविकांशी विशाल परब याने संवाद साधला व त्यांना दत्त जयंतीच्या दिल्या शुभेच्छा
सावंतवाडी प्रतिनिधी
गुरुवारी दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी विशाल परब यांनी पत्नी सौ.वेदिका सह ठिकठिकाणी दत्तदर्शन घेतले. मंदिरातील टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘दिगंबरा’चा जयघोष ऐकून मन प्रसन्न झाले ईश्वराकडे एकच मागणं सर्वांच्या आयुष्यात असाच आनंद आणि समाधान कायम राहो.
संपूर्ण महाराष्ट्रात गुरुवारी दत्तजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, सावंतवाडी शहरातही हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या पवित्र पर्वाचे औचित्य साधून विशाल परब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वेदिका परब यांनी सावंतवाडीतील विविध दत्तमंदिरांना भेटी देऊन दर्शन घेतले.
शहरातील प्रमुख दत्तमंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची रीघ लागली होती. विशाल परब यांनी पत्नीसह मंदिरांत जाऊन विधिवत पूजा केली आणि श्री दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होत सावंतवाडीवासियांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या अनेक भाविकांशी विशाल परब यांनी संवाद साधला व त्यांना दत्तजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मंदिरांमधील टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष यामुळे वातावरण अत्यंत मंगलमय झाले होते.
