महसूलच्याच अधिकाऱ्यांची अनधिकृत व्यावसायिकांना साथ असल्याचा संशय,मात्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्याची शंका
योग्य ती कारवाई करा,अन्यथा महसूल आयुक्तांकडे तक्रारीतून दाद मागणार
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळातील काही वाळू व्यावसायिकांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी गाडी नं GA11 T 9936 व GA11 T 6399 हायवा गाड्या पकडून कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिल्या. सदरच्या गाड्यांमधून ओव्हरलोड खडी वाहतूक होत असल्याच्या संशय काही वाळू व्यावसायिकांना आला.त्या गाड्या पकडून कुडाळ पोलीस स्थानकात आणल्यानंतर प्रत्यक्षात कळले की या गाड्यांमधून सिलिका पासचा वापर करून बॉक्साइड सदृश्य मालाची वाहतूक होत आहे. प्रत्यक्षात सिलिका सॅंड ही वाळू फॉर्ममध्ये स्वरूपात असते.पकडलेल्या गाड्यांमध्ये असणारा माल हा खडी स्वरूपात आहे. या गाड्यांमधील खडी ही बॉक्साइड सदृश्य असल्याने याची योग्य व सक्षम लॅब द्वारे तपासणी करून त्यावर दंडात्मक कारवाई करावी तसेच शासनाच्या नियमानुसार या अनधिकृत खनिजासाठी वापर होणाऱ्या या गाड्यांचा परवाना देखील रद्द करावा.जर चुकीच्या पद्धतीने गाड्या सोडविल्यास महसूल आयुक्तांकडे तक्रारीतून दाद मागणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांने बोलताना सांगितले.
