शिवसेना नेते अरविंद सावंत,भास्कर जाधव,अरुण दुधवडकर यांची असणार प्रमुख उपस्थिती
जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकांचा घेणार आढावा
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
जिल्हयातील होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत,शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. २३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुडाळ एम.आय.डी.सी रेस्ट हाऊस येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होणार असून जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा ते आढावा घेणार आहेत अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
