मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पाच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र
सावंतवाडी : सिंधुदुर्ग केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मध्ये मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पैलवान पै. चेतन राणे यांनी दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग केसरी हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यात क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या एकूण पाच कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून ही प्रतिष्ठानसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
निवड झालेल्या कुस्तीपटूंमध्ये –
पै. चेतन राणे – सिंधुदुर्ग केसरी किताब
पै. कुणाल परब – ७४ किलो वजनी गट
दशरथ गोंद्याळकर – ६५ किलो वजनी गट
बुधाजी हरमलकर – ६१ किलो वजनी गट
यांचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी कुस्तीपटूंना मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव पै. ललित हरमलकर, खजिनदार पै. गौरव कुडाळकर, सहसचिव फिजा मकानदार तसेच मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमने हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू घडवण्याचे मल्लसम्राट प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असून, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हे खेळाडू उज्वल यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
