सिंधुदुर्ग प्रतिनिधी
रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे सुमारे 50014 च्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. नारायण राणे यांची शेवटची निवडणूक म्हणून आणि राणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाने त्यांना भरभरून साथ दिली. या निवडणुकीत राणेनी आपली राणे स्टाईलने या लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या वतीने आणि भाजपच्या वतीने जल्लोष साजरा केला जात आहे.