कुडाळ मध्ये महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजयोत्सव साजरा करताना पदाधिकारी कार्यकर्ते…..

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ गांधीचौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीतील पदाधिकारी यांनी आपले राणे साहेबांबद्दलचे गौरवोद्गार काढले,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, शिवसेना प्रवक्ता श्री.रत्नाकर जोशी, मनसे उपजिल्हाध्यक्ष .कुणाल किनळेकर,मनसे तालुकाध्यक्ष हेमंत जाधव,प्रथमेश धुरी,यतीन माजगावकर,अक्षय जोशी,शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय भोगटे,शिवसेना विभागप्रमुख श्री.जयदीप तुळसकर,श्री.विठ्ठल शेडगे,शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडोलकर,महिला युवतीसेना तालुकाप्रमुख सौ.गायत्री गोलम,शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ.अनघा रांगणेकर,महिला आघाडी उपविभागप्रमुख सौ.आशू अग्रवाल,शिवसैनिक कु.मयूर अग्रवाल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page