कणकवली प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शर्मिला राज ठाकरे, आमदार नीतेश राणे, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांचे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे राणे यांनी आभार मानले,