सरपंच सौ सावित्री पालेकर;लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे
आंबोली प्रतिनिधी
दर वर्षी आंबोली घाटात रस्त्यावर झाडे पडद असतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग कधीही एकत्रित रित्या दोखादायक झाडाबाबत सर्वे करून धोकादायक झाडे छाटणे किंवा कापणे या साठी कार्यवाही करताना दिसत नाहीत.
दरवर्षी झाडे रस्त्यावर पडल्यावर व रस्ता वाहतुकी साठी बंद झाल्यावरच कार्यवाही करतात.
आंबोली ग्रामपंचायत ने गेल्या वर्षी सुद्धा या बाबत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती संबंधित विभागाणा केली होती व या वर्षी सुद्धा केली आहे. मात्र या बाबत ठोस कार्यवाही होताना संबंधित विभागाकडून होताना दिसत नाही.
सुदैवाने आता पर्यंत मोठी जीवित हानी झाली नाही मात्र जर एकदा मोठा अपघात घडलाच तर त्याला पूर्ण पणे सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग जबाबदार असणार.
पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे कि लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे व लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केली आहे.
