सिंधुदुर्गात उद्या रेड अलर्ट जोरदार पावसाची शक्यता…

प्रादेशिक हवामान विभागाने अतिवृष्टीचा दिला इशारा

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 08 जून ते दिनांक 11 जून 2024 या कालावधीत प्रादेशिक हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे.

सदर इशारा पार्श्वभूमीवर *

(१) सर्व यंत्रणांनी अलर्ट रहावे.

(२) सर्व यंत्रणा प्रमुखांनी स्वतः तसेच आपले अधिनस्थ अधिकारी/कर्मचारी यांना वीज पडण्याची सूचना देणारे दामिनी अॅप आणि अतिवृष्टी बाबत सूचना देणारे सचेत अॅप आपल्या मोबाईल मध्ये डाऊन लोड करण्यास सांगावे

(३) अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपले नियंत्रण कक्ष अलर्ट मोड वर ठेवावेत आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची त्वरित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page