सावंतवाडी (प्रतिनिधी)
सावंतवाडी तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान. नाम. दिपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने दि. १३ जून रोजी संध्याकाळी ३ वाजता वैश्य भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक हायस्कूल मधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाम. दिपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.