कुडाळ (प्रतिनिधी)
उद्याच्या 19 जून ते 1 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील 142 कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, याच कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस वादळी वारे सह अतिवृष्टी होत असते .याचा विचार करता या भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या नियमानुसार 100 मीटर रनिंग, 1600 मीटर रनिंग, गोळा फेक यासारखे मैदानी प्रकार अनिवार्य असतात. या मैदानांमधे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे चिखल व पाणी साचलेले असु शकते.. अशा मैदानी प्रकारात सेकंद आणि मिलीमीटर पण खुप महत्वाचे मानले जातात. पावसाळ्यात हे सर्व तपासणे आणि सादर करणे जिकीरीचे होण्याची शक्यता आहे. शिवाय भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येत उमेदवार सामील होतात त्यांना सुधा मोठी अडचण होण्याची शक्यता वाटते.
तरी या सर्व गोष्टींवर गांभीर्यपूर्वक आणि सहानुभूतीपूर्वक विचार करुन मार्ग काढावा. अशी विनंती निवेदन अर्जात केली आहे.
ऐन पावसाळ्यात होणाऱ्या पोलिस भरती बाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी वेधले गृहमंत्र्यांचे लक्ष.
