आयत्या पिठावर रेगोटे मारणाऱ्यांनी आपल्या गावात पर्यटन सुरू करून नंतरच आंबोलीवर चाल करावी:
आंबोली ग्रामस्थांचा सवाल
आंबोली (विष्णू चव्हाण)
आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर कुणाचीही मनमानी चालणार नाही. त्या धबधब्यावर कुणीही तिकीट विक्री करु नये,कुणी आपली हुकुमशाही दाखवली तर त्याच भाषेत ऊत्तर दिले जाईल असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.वनविभाग आपले काम न करता शासनाने दिलेला निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहेत. घाटात वनविभागाचे काम चालू आहेत त्याची परवानगी केंद्र सरकार कडुन न घेता नैसर्गिक सौदर्य नष्ट करुन हुकुमशाहीत काम चालू आहे. याबाबत ग्रामस्थ योग्य तो पवित्रा घेणार आहे. आंबोली हे गांव पर्यटन म्हणून घोषित असताना. आंबोली प्रशासनाला डावलुन स्वयंघोषित निर्णय घेत आहेत.निधी आंबोलीच्या नावावर नाव दुसऱ्याचे हे खपवुन घेणार नाही. आयत्या पीठावर रेगोटे मारणाऱ्यांनी आपल्या गांवात पर्यटन सुरु करुन नंतर आंबोली वर चाल करावी असे आवाहन करण्यात आले आहे.आंबोली धबधबा हे नाव जगात प्रसिद्ध झाले आहे, ते बदलण्याचा कुणी केविलवाणी प्रयत्न करू नये असे आवाहन संतोष पालेकर,विष्णू चव्हाण,सुनिल नार्वेकर, उत्तम नार्वेकर, शशिकांत गावडे, विशाल बांदेकर,प्रकाश गावडे,याने कले आहे.