तहसिलदार वीरसिंग वसावे:विद्यार्थी व नागरीकांनी लाभ घ्यावा
कुडाळ (प्रतिनिधी)
उन्हाळी सुट्टी संपुन आता शाळा,काॅलेजसह विविध कोर्सेस करिता प्रवेश सुरु झाले आहेत, त्यामुळे मुलांना आवश्यक असणारे दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत याकरिता कुडाळ तालुक्यात माणगाव,कडावल व नेरूर – देवुळवाडा या ३ ग्रामपंचायत मध्ये गुरूवार दि.२० जुन ते शनिवार दि.२२ जुन पर्यंत खास “दाखले शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.तरी विद्यार्थी व नागरीकांनी दाखल्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे शिबिर ठिकाणी सादर करावीत व पुढील चार दिवसात आपले दाखले स्विकारावेत असे आवाहन कुडाळ तहसिलदार वीरसिंग वसावे यांनी केले आहे.
शाळा,काॅलेजसह विविध कोर्सेसच्या प्रवेशाकरिता जात प्रमाणपत्र,उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेयर दाखला, वय अधिवास दाखला, ईडब्लूएस दाखला, महिला आरक्षण दाखला, रहिवास प्रमाणपत्र आदि दाखल्याची मुलांना आवश्यकता असते.कुडाळ तालुक्यात हे सर्व दाखले दोन ते चार दिवसात देण्यासाठी खास शिबिर आयोजित करण्यात आले आहे.त्या-त्या भागातील मध्यवर्ती ठिकाणं म्हणून गुरुवार दि.२० जुन रोजी ग्रामपंचायत माणगाव येथे स.९ ते ५ वा.पर्यत, शुक्रवार दि.२१ जुन ग्रामपंचायत कडावल येथे सकाळी ९ ते सायं.५ वा.पर्यत, शनिवार दि.२२ जुन ग्रामपंचायत नेरूर देवुळवाडा येथे सकाळी ९ ते सायं.५ वा.पर्यत दाखल्यासाठी खास शिबिर आयोजित करण्यात आले आहे.तरी विद्यार्थी व नागरीकांनी दाखल्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे शिबिर ठिकाणी सादर करावी.त्याच ठिकाणी दाखल्यासाठीचे अर्ज उपलब्ध होतील.
कुडाळ तालुक्यातील विद्यार्थी,नागरीक यांची गैरसोय होऊ नये,ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरीकांना अधिक आर्थिक भुर्दंड पडुन नये याकरिता या दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा कुडाळ तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थी व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ तहसिलदार वीरसिंग वसावे यांनी केले आहे.