कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांची उपस्थिती…
कुडाळ प्रतिनिधी
आज नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत सभागृहात शालेय विद्यार्थ्यांना लागणारे दाखले कुडाळ तहसीलदार श्री.विरसींग वसावे,नायब तहसीलदार श्री.पाटील,नेरूर तलाठी श्री.मसुरकर,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी शासनाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार,नायब तहसीलदार तलाठी,आदी कर्मचारी पदाधिकारी यांचे विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले.
