सावंतवाडी प्रतिनिधी
मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल, मळेवाड येथे महाराष्ट्र राज्य कृषी सप्ताह निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब उपस्थित होते.
ग्लोबल वार्मिंग मुळे दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे आणि त्याच कारणाने पर्यावरण असंतुलित झाले आहे. म्हणूनच दरवर्षी तापमानाचा एक नवीन उचांक गाठल्या जात आहे. त्याचा गंभीर परिणाम सर्व सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर व जगण्यावर होत आहे. त्यामुळे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन एक काळाची गरज बनली आहे, असे मत परब यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी ॲड.अनिल निरवडेकर, उपसरपंच हेमंत मराठे, मुख्याध्यापक साळसकर सर, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, बूथ अध्यक्ष अमित नाईक, राठोड सर, साटेलकर मॅडम, रेडकर मॅडम, राऊळ मॅडम, अंकित गवणकर, प्रदिप चौधरी, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, संदेश मोरजकार, अमर नेमण आदी मान्यवर उपस्थित होते.
