कोटीच्या घोषणा करून किंवा रोजगार आणण्याच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करू नये अन्यथा येणारी युवा पिढी माफ करणार नाही
आशिष सुभेदार:मुलांचे होणारे नुकसान याला जबाबदार कोण याचे उत्तर केसरकरांनी द्यावे सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील वेरोनियम कंपनीने फसवणूक केलेल्या 210 कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी आणि त्यांना नव्याने रोजगार मिळवून द्यावा नाहक जर्मनीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करू नये. सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे…
