आशिष सुभेदार यांची मागणी…
सावंतवाडी प्रतिनिधी
मुंबई घाटकोपर येथे होर्डिंग्स कोसळून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरासह तालुक्यात असलेल्या होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
सावंतवाडी शहरासह तालुक्यात वर्दळीच्या ठिकाणी हायवेवर अशा प्रकारचे मोठी मोठी होर्डिंग लावण्यात आलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस लक्षात घेता या ठिकाणी धोका किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशा होर्डिंग्सची तपासणी करण्यात यावी त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरात इमारतींवर बसविण्यात आलेले टॉवर यांची देखील सुरक्षेसाठी तपासणी व्हावी तसेच धोकादायक असलेले होर्डिंग्स तात्काळ हटविण्यात यावी अशी मागणी श्री सुभेदार यांनी केली याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.