नारुर महालक्ष्मी मंदिरात ३ ते १२ ऑक्टोंबर ला नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम*
कुडाळ प्रतिनिधी नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नारुरच्या महालक्ष्मी मंदिरात विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. श्रावण मासानंतर नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता घटस्थापना…