कुडाळ प्रतिनिधी
नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नारुरच्या महालक्ष्मी मंदिरात विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. श्रावण मासानंतर नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता घटस्थापना होईल. त्यानंतर विविध धार्मिक विधी होतील. तसेच ३ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत रोज सायंकाळी ७.३० वाजता श्री. मेस्त्रीबुवा (कालेली) यांची कीर्तने होणार आहेत. यात ३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘दुर्गा- मधुकैठब वध’, ४ रोजी ‘कृष्ण- रुक्मिणी स्वयंवर’, ५ रोजी ‘राम- रामभक्त केवट’, ६ रोजी ‘संतचरित्र-संत गोरा कुंभार’, ७
रोजी ‘अफझलखान वध’ आदी विषयांवर कीर्तने होणार आहेत. ८ व ९ रोजी जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ७००१ रुपये, द्वितीय ५७७७ रुपये, तृतीय ३७७७ रुपये, उत्तेजनार्थ २७७७ रुपये, तसेच वैयक्तिक पारितोषिके व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहेत. १० रोजी सायंकाळी ७ पासून देवी महालक्ष्मीचा वार्षिक गोंधळ व जागरण कार्यक्रम, रात्री ८ वा. महाप्रसाद, ११ रोजी सायंकाळी ७.३० वा. गावातील सर्व शाळा व अंगणवाडीतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, १२ रोजी दुपारी २ वा. सीमोल्लंघन, रात्री ९.३० वा. सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार मंडळ, नेरुरचे नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देवी महालक्ष्मी देवस्थान चार बारा गावकर मंडळी बहुमानकरी, महालक्ष्मी देवस्थान स्थानिक समिती व ग्रामस्थांनी केले आहे.