राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे सा.बां. विभागाचे कार्यालय फोडल्याच्या गुन्ह्यातून माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता
अॅड.सुधीर राऊळ,अॅड.कीर्ती कदम व अॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी केला युक्तिवाद मालवण प्रतिनिधी मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंच धातूचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटमुळे छत्रपतींचा अपमान झाल्याने माजी आमदार वैभव विजय नाईक यांनी याप्रकरणी मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून त्या कार्यालयात जाऊन दांड्याने दरवाजा – खिडक्यांच्या काचा फोडून व…
