शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्था रजि.महाराष्ट्र यांचा स्तुत्य उपक्रम..!
कणकवली प्रतिनिधी
शिक्षण प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त
शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा.श्री.मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे, मु.पो. बोर्डवे, ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग येथील प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची महत्वाची गरज ओळखुन
शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्था
आणि
लेखक/दिग्दर्शक/अभिनेता श्री. श्रमेश बेटकर (सोनी मराठी महाराष्ट्राची हास्य जत्रा , चित्रपट लास्ट स्टॉप खांदा)
यांच्या माध्यमातुन सदर आश्रम शाळेसाठी वॉटर फिल्टर (५५ लीटर ) भेट देण्यात आला,त्याप्रसंगी अभिनेते श्री. श्रमेश बेटकर यांनी आश्रमशाळेतील मुलांशी व्हिडिओ कॉल द्वारे शुभेच्छा दिल्या, त्यानंतर तेथील मुलांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचे स्मितहास्य आणि समाधान पाहायला मिळाले.
तसेच,
राष्ट्रीय स्तरावरील रंगभरण सर्धेमध्ये सदर संस्थेचे सदस्य श्री. अभिजीत गोसावी यांचे सुपुत्र,
कु.राजवीर अभिजीत गोसावी (इयत्ता – पहिली) याने कांस्यपदक प्राप्त केल्याबद्दल त्यांनादेखील त्याठिकाणी संस्थेतर्फे गौरविण्यात आले.
प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना अभिनेते श्री.श्रमेश बेटकर यांनी कॉलद्वारे शुभेच्छा देत संस्थेचे आभार मानले.
त्याप्रसंगी, आश्रम शाळेचे अध्यक्ष मा.श्री.भालचंद्र गोसावी साहेब, मुख्याध्यापक मा.श्री. आनंद कर्पे सर, माजी शिक्षिका सौ.रोशनी गोसावी तसेच सचिव सौ.प्रीती गुरव, खनिजदार श्री.स्वप्नील गोसावी, शिवस्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.प्रशांत खांबळ यांच्यासह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थिती होते.
