सिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करा
मालवण प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हयातील चिपी विमानतळावरुन सिंधुदुर्ग-पुणे- सिंधुदुर्ग ही विमानसेवा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी भाजप खासदार नारायण राणेंना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हयाचे चिपी (बॅ. नाथ पै) विमानतळ सुरु होऊन सुमारे तीन वर्षे उलटली आहेत. या विमानतळावरुन…