गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि सिंधुदुर्गकरांच्या सोयीसाठी खा. नारायण राणे यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
कोकणचा महत्वपूर्ण असलेला गणेशोत्सव सण नजिक येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेऊन मुंबई -सिंधुदुर्ग – मुंबई ही महत्त्वपूर्ण विमान सेवा तातडीने सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. या चर्चेदरम्यान ना. राममोहन नायडू यांनी ही सेवा तत्काळ पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे.
