आमदार वैभव नाईक यांची तात्काळ मदत!
कुडाळ (प्रतिनिधी)
पाट तेलीवाडी मधील रामचंद्र उर्फ बाळु तेली यांचे मातीचे घर भुईसपाट झाले असुन शिवसेना उपविभागप्रमुख महेश वेळकर यांच्या सुचनेनुसार कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ आर्थिक मदत करुन घरकुल योजनेतुन प्रस्ताव मंजूर करुन सहकार्य केले जाईल अशी ग्वाही शिवसेनेचे अतुल बंगे यांनी दिली!
पाट तेली वाडीतील गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे रामचंद्र उर्फ बाळु तेली यांचे घर पुर्ण कोसळले असल्याने आज आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे अतुल बंगे यांनी भेट दिली यावेळी आर्थिक मदत देऊन घर पुर्ण करुन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील याची ग्वाही श्री बंगे यांनी देऊन आमदार वैभव नाईक म्हणजे जनतेचे देवदूत असुन कधितरी उगवुन स्वार्थ साधणारे नसुन जनतेचे सेवक म्हणून काम करीत असल्याचे श्री बंगे यांनी सांगितले!
पाट शिवसेना उपविभागप्रमुख महेश वेळकर यांच्या सुचनेनुसार त्यांना तात्काळ सहकार्य आम नाईक यांनी देऊन त्यांच्या साठी वाटेल ते सहकार्य करण्याची ग्वाही श्री बंगे यांनी दिली यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख महेश वेळकर, कुडाळ शिवसेना नगरसेवक उदय मांजरेकर, युवा सेनेचे राजु गवंडे, युवा सेनेचे संदेश सावंत, शिवसेना एसटी कामगार शिवसेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, ग्रामपंचायत सदस्या सौ वैष्णवी शेगले, रामचंद्र तेली,पियुष तेली,गुरु तेली, अक्षय तेली आदी उपस्थित होते
