कुडाळ
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित गटस्तरीय समरगीत स्पर्धा मंगळवार दिनांक २३जुलै २०२४रोजी दुपारी २:००वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ठिक ५:००वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष मा. श्री. मोहन गुरुनाथ होडावडेकर संचालक कॉनबॅक, कुडाळ एम आय डी सी इंडस्टी असोसिएशन व प्रमुख पाहुणे , अजितपालसिंह दिनोरे कार्यकारी अभियंता प्रशासन कुडाळ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. तसेच विशेष उपस्थितीत मा. श्री. सुरेश अंकुश बोवलेकर संचालक बोवलेकर कॅशू फॅक्टरी वेंगुर्ला, हे या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहणार आहे. तरी आपण जास्ती जास्त गटस्तरीय समरगीत स्पर्धेसाठी उपस्थितीत राहावे. असे आवाहन अरूण लाड कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय चिपळूण यानी केले आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चिपळूण याच्या वतीने गटस्तरीय समरगीत स्पर्धा…
