महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. अशोक साळुंखे अधिकाऱ्यांसह रहाणार उपस्थित..
कणकवली : वीज वितरण च्या निर्माण झालेल्या समस्या आणि विजेचा सुरू असलेला खंडोबा याबद्दल आमदार नितेश राणे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सरपंच आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक १ ऑगस्ट रोजी कणकवलीत प्रहार भवन येथे आयोजित केले आहे. दुपारी साडेबारा वाजता ही बैठक सुरू होणार आहे. यंदाच्या पावसाळ्यामुळे कणकवली तालुक्यामधील निर्माण झालेल्या विद्युत समस्यांमुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. नितेश राणे यानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक गुरुवार दिनांक १ ऑगस्ट रोजी प्रहार भवन कणकवली येथे दुपारी १२.३० वाजता आयोजित केली आहे. सदरहू बैठकीसाठी महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. अशोक साळुंखे आपल्या अधिकारी वर्गासह उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी व जनतेने या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.