अर्ज दाखल करताना भाजप प्रचंड शक्ती प्रदर्शन करणार,रत्नागिरीत कमळसागर उसळणार..
(सिंधुदुर्ग प्रतिनिधी)
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे १९ एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. स्वतः केंद्रीयमंत्री नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रत्येक गावातून किमान 50 कार्यकर्ते राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीला रवाना होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा प्रचंड शक्तिप्रदर्शन करणार आहे. यानिमित्ताने रत्नागिरीत कमळसागर उसळणार असल्याचे दिसून येत आहे. नारायण राणेंच्या माध्यमातून तळकोकणात कैक वर्षानंतर कमळ निशाणीवर लोकसभा निवडणूक लढवली जाणार असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना रत्नागिरीत जाण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने जिल्हा परिषद विभागातील बूथनिहाय अध्यक्षांच्या आज बैठका होत असून प्रत्येक गावातून किमान 50 कार्यकर्ते रत्नागिरीला जाण्यासाठी चे नियोजन करण्यात येणार आहे.