भाजप ची 13 वी यादी जाहीर..
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज भारतीय जनता पक्षाची १३ वी यादी जाहीर करण्यात आली त्यात नारायण राणे यांचे नाव अखेर जाहीर झाले आहे. गेले खूप दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहणारे याबाबत उलट सुलट चर्चा होत होत्या शिवसेनेकडून किरण सामान्य आणि दावा केला होता. परंतु आज पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत यांनी आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. पण भविष्यात किरण सामंत यांना कोणत्याही परिस्थितीत खासदार करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे
