कुडाळ (प्रतिनिधी)
बदलापूर शाळकरी मुलींवर अत्याचार झाला त्या घटनेचा निषेध करण्यासाठी कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तोंडाला काळापट्टा बांधून मौन व्रत घेऊन आंदोलन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रांतिक सदस्य श्री प्रकाश जैतापकर कुडाळ तालुका अध्यक्ष श्री अभय शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय प्रभू , सुंदर सावंत शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तबरेज शेख उल्हास शिरसाठ, तोसिफ शेख बाळा राऊळ ,चव्हाण उपस्थित होते.