दारू वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कची कारवाई;सावंतवाडीतील दोघे ताब्यात

दारूसह ४ लाख १४ हजाराचा मुद्देमाल जप्त…

सावंतवाडी प्रतिनिधी
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ लाख १४ हजाराच्या दारूसह ३ लाखाची गाडी असा एकूण ४ लाख १४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश लक्ष्मण चव्हाण (वय ३५) व सिसिल जॉन फेराव (वय ५५) दोघे रा. सबनीसवाडा अशी त्यांची नाव आहेत. ही कारवाई आज पहाटे तेरेखोल नदी पुलावर, आरोसबाग येथे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाकडून करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अवैध मद्य वाहतुकीच्या संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना बेकायदा गोवा बनावटीची दारू आढळून आली. या प्रकरणी गणेश चव्हाण व सिसिल फेराव यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मद्याच्या विविध बॅन्डचे २४ बॉक्स मिळून आले असून एकूण ४ लाख १४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, धंनजय साळुंखे, विवेक कदम, रणजीत शिंदे, वाहन चालक, दिपक वायदंडे, सतिश चौगुले, सागर सुर्यवंशी, अभिषेक खत्री यांनी केली. याबाबत अधिक तपास दुय्यम नि धंनजय साळुंखे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page