राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी बैठक संपन्न..

सावंतवाडी (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सावंतवाडी तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पक्षसंघटना बांधणीविषयी सौ. घारे यांनी बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

सावंतवाडी येथे कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक नियोजन व बांधणीबाबतचे मार्गदर्शन सौ. घारे यांनी केले. संस्थापक अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना अपेक्षित संघटनात्मक काम करण्याचा संदेश उपस्थित बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना दिला.

यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री.पुंडलिक दळवी , शहराध्यक्ष श्री.देवेंद्र टेमकर , महिला शहराध्यक्ष अँड. सौ.सायली दुभाषी , युवती जिल्हाध्यक्ष सौ.सावली पाटकर , मारीता फर्नांडिस , विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस , सावंतवाडी युवक शहर अध्यक्ष नयिम मेमन , विधानसभा युवती अध्यक्ष सौ. सुनिता भाईप , युवती तालुकाध्यक्ष सौ.सुधा सावंत काशिराम दुभाषी, जॉनी फर्नांडिस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page