सावंतवाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित कुडाळ तालुका मर्यादित पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील एकुण तेवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मधुन प्रथम क्रमांक अक्षय शिवाजी तेंडुलकर, आंदुर्ले. द्वितीय क्रमांक केदार राऊळ, कुडाळेश्वरवाडी तसेच तृतीय क्रमांक अनिकेत अरुण मेस्त्री,नेरुर. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देवुन जिल्हाध्यक्ष धीरज परब उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांच्या हस्ते सन्मानित केले .हॉटेल लाईम लाईट येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बक्षीस वितरण करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र सैनिक अनिकेत ठाकुर,अक्षय जोशी,चेतन राऊळ,सुरज नेरुरकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024चे वितरण
