सावंतवाडी प्रतिनिधी
आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो. गणेशोत्सव गेल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या धुमधडक्यात होतो. नऊ दिवस सुरु असणाऱ्या या नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रौत्सव निमित्ताने ओमकार नवरात्रौत्सव मिञमंडळ भटवाडीकडून दुर्गामातेचे पुजन केले जाते, या दुर्गामातेचे आज वाजत गाजत आगमन झाले आहे,
या मिरवणुकीला उपस्थित मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर दिलीप भालेकर अध्यक्ष दीपक सावंत भरत परब कुणाल शृंगारे संतोष खंदारे विजय सावंत राजा दळवी शिवम सावंत प्रदीप भालेकर प्रसाद परब आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.